Thursday, August 12, 2010

पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी

१) पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी :
* २०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
* २००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
* दिवंगत गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांना नुकताच पाकिस्तान सरकारने 'सितारा-ह-इम्तियाझ' पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला.
* ४६व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा कै. दादासाहेब फाळके पुरस्कार 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटाला मिळाला. (दिग्दर्शक-परेश मोकाशी)
* २००९चा बुकर पुरस्कार-कॅनडाच्या लेखिका अ‍ॅलिस मुन्रो यांना मिळाला.
* महाराष्ट्र शासनाच्या संत ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारासाठी नुकतीच जगन्नाथ महाराज पवार-नाशिककर यांची निवड (यापूर्वी रा. चि. ढेरे व ह.भ.प. दादामहाराज मनमाडकर यांना गौरविण्यात आले.)
* २००९ चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार-सामाजिक कार्यकर्ते दीप जोशी यांना मिळाला.
* २००८चा भारतरत्न पुरस्कार-पं. भीमसेन जोशी. या अगोदर २००१ मध्ये लतादीदी मंगेशकर व बिस्मिल्ला खाँ यांना मिळाला. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून सुरुवात सन १९५४ सालापासून झाली.
* पहिला भारतरत्न पुरस्कार-सी. राजगोपालाचारी, एस. राधाकृष्णन व सी. व्ही. रामन यांना मिळाला.
* २००९चे शांततेचे नोबेल पारितोषिक-बराक ओबामा.
* २००९चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक-व्यंकटरामन रामकृष्णन
* भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते-रवींद्रनाथ टागोर (१९१३-साहित्य)
* २००९चा साहित्य अकादमीचा पुरस्कार-हिंदी कवी कैलास वाजपेयी यांच्या 'हवा में हस्ताक्षर'ला देऊन गौरविण्यात आले.
* २००९ची मिस वर्ल्ड-कायनी अल्दोरिनो (जिब्राल्टर)
* २००८चा दादासाहेब फाळके पुरस्कार-सिनेमॅटोग्राफर बी. के. मूर्ती यांना देऊन गौरविण्यात आले.
* २००९ चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार-अभिनेत्री सुलोचना.
* २००९ चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार- प्रणव मुखर्जी
* २००९चा जनस्थान पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक)- ना. धों. महानोर
* २००९चा महात्मा गांधी शांतता पुरस्कार- म्यानमारच्या ऑग सान स्यू की यांना मिळाला.
* सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांना अलिगड मुस्लिम विद्यापीठाकडून 'डी. लिट' पदवी देऊन गौरविण्यात आले.
* परमसंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एसीएम फेलो पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली.

No comments:

Post a Comment

Latest Exam Papers & Recruitments